वैजापूर, (प्रतिनिधी) अवैद्य कत्तलखान्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत ३० गोवंश व मांस जप्त केले आहे.
बेलगाव परिसरात एका मदरशा जवळ कातडी व्यवसाय च्या नावाखाली गोमास विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी आपल्या पथकासह शनिवारी रात्री ९ वाजता त्या ठिकाणी धाड टाकली. असता त्या ठिकाणी पोलिसांना ३० गोवंश जातीची जनावरे मिळून आली.
काही मांस सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले. संबंधित व्यक्तीचा मड्याच्या व्यवसाय आडून गोवंश कत्तलीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सर्व गोवंश वैजापूर येथील गोशालेत पाठवली आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहे. सदर कार्यवाही वैजापूर पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, उपनिरीक्षक नलावडे, नागरगोजे, युवराज पाडळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश झाल्टे, किसन गवळी, अविनाश भास्कर, गणेश काळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत गीते, प्रल्हाद जटाळे, अमोल कांबळे, नवनाथ केरे, अजित नाचन, गणेश कुलट आणि रंजीत चव्हाण यांच्या पथकाने केली.














